आमचे लाडके शहर आमचा लाडका हो वाडा
आमचा मानाचा हो बिंदू लावले झेंडे अटकेपार
दिन होता रथसप्तमीचा
होता शनिवार वार,झाली वास्तू शांत
सतराव्या शतकात जानेवारी बावीस
मानाचा हो मुजरा थोरल्या बाजीराव पेशव्यास
छत्रपतींशी वहिल्या हो निष्ठा
राज्य वाढविले हो खास
बाळाजी विश्वनाथ आले कोकणातून
चरणी शाहुची हो सेवा
दिली मराठेशाही ला हो साथ
सोबतीला नवे सरदार मातब्बर
असे शैली त्यांची खास
वेग ज्याचे हत्यार
तलवारीचे पाणी पाजून
थोरल्या बाजीरावाने अपराजित योध्याने
अवघ्या शा आयुष्यात
कोरला पराक्रम
थोर चिमाजी भावासह
वाडा बांधला हो खास पुण्याचा नगरीत
गणेशाची स्थापना बांधले महाल
पेशवाईच्या मराठेशाहीच्या ताकदीची
शाहू निष्ठेने केली तलवारीने केली
पुढील पिढी तयार..
शनिवार वाड्याला हो पुण्य नगरीला हो
दिला आकार पेशवा तो नानासाहेब
आणले पाणी हो पुण्यात
बांधील्या पेठा राखीत शाहूंची मर्जी
लावले झेंडे अटकेपार केला इतिहास
पानिपताने केले अब्दालीला चकित
पण झाले सैरभैर सोडला तो प्राण
जीवा भावाचा तो पुत्र अन् भाऊ जेव्हा गेले हो सोडून
माधवराव तो पेशवा त्याला राघोबा चा जाच
तरी आणले वेठीस निजाम हैदर
पानिपताचा हो वचपा केली दिल्ली हो काबीज
झाली कीर्ती मराठेशाहीची वाढीला हो मान
पण याच वाड्याने पहिला धन्याचा हो खून
सवाई माध वाच्या वतीने बारभाई कारस्थान
सर्वांनी मिळून हो ओढला कारभार
फिरंगी हे फार चतुर फोडले आपलेच सरदार
व्यापारी म्हणून आले केला देश नावावर
या वाड्याचा या मातीचा ना राखीला मान
वाड्याला आगी लावून तोड फोड करून
वाड्याचा अन् मराठेशाहीचा इतिहास मोठा
पिढ्यानपिढ्या हो आम्ही जपु हा वारसा ...
मनिष केळकर. पुणे
Comments
Post a Comment