Posts

Showing posts from December, 2022
Image
  आमचे लाडके शहर आमचा लाडका हो वाडा आमचा मानाचा हो बिंदू लावले झेंडे अटकेपार दिन होता रथसप्तमीचा होता शनिवार वार,झाली वास्तू शांत सतराव्या शतकात जानेवारी बावीस मानाचा हो मुजरा थोरल्या बाजीराव पेशव्यास छत्रपतींशी वहिल्या हो निष्ठा राज्य वाढविले हो खास बाळाजी विश्वनाथ आले कोकणातून चरणी शाहुची हो सेवा दिली मराठेशाही ला हो साथ सोबतीला नवे सरदार मातब्बर असे शैली त्यांची खास वेग ज्याचे हत्यार तलवारीचे पाणी पाजून थोरल्या बाजीरावाने अपराजित योध्याने अवघ्या शा आयुष्यात कोरला पराक्रम थोर चिमाजी भावासह वाडा बांधला हो खास पुण्याचा नगरीत गणेशाची स्थापना बांधले महाल पेशवाईच्या मराठेशाहीच्या ताकदीची शाहू निष्ठेने केली तलवारीने केली पुढील पिढी तयार.. शनिवार वाड्याला हो पुण्य नगरीला हो दिला आकार पेशवा तो नानासाहेब आणले पाणी हो पुण्यात बांधील्या पेठा राखीत शाहूंची मर्जी लावले झेंडे अटकेपार केला इतिहास पानिपताने केले अब्दालीला चकित पण झाले सैरभैर सोडला तो प्राण जीवा भावाचा तो पुत्र अन् भाऊ जेव्हा गेले हो सोडून माधवराव तो पेशवा त्याला राघोबा चा जाच तरी आणले वेठीस निजाम हैदर पानिपताचा हो वचपा केली दिल्ली ह
बदलाव ! काही दिवसांपुर्वीच बी जी टुर्स मार्फत सहकुटुंब उत्तरप्रदेशातील तिर्थस्थळांना भेट देण्याचा योग आला. राममंदिराचा निकाल आल्यावर आई वडिलांना काशी-अयोध्येला घेवून जाण्याची तीव्र इच्छा झाली. पण नंतर लगेच कोव्हिड आला आणि सर्व प्लॕन फिस्कटले. दुर्दैवाने दुसऱ्या लाटेत वडिल गेले. कोव्हिड संपल्यावर आईला या तिर्थयात्रेला घेऊन जायचे असे ठरवले होते. सुदैवाने सगळे जुळून आले आणि आम्ही सहपरिवार तिर्थयात्रेला निघालो. आमचा पंधरा-वीस कुटुंबांचा 38-40 जनांचा एक ग्रुप आहे. वयाने 88 वर्षांचे पण उत्साहात अगदी तरूण असलेले आमचा शेजारी बापु पंचवाघ यांच्या पुढाकाराने यापुर्वी या ग्रुपच्या अनेक ट्रिप झाल्या आहेत. बापू म्हणजे आम्हा सर्वांसाठी 'फादरली फिगर' आहेत. बी जी टुर्स कडून बापू आमच्या ट्रिप कस्टमाईज करून घेतात. आम्ही विमानाने सर्वप्रथम प्रयागराजला गेलो. तेथून आम्हाला आमची बस मिळाली. पुढे आठ दिवस ही आरामदायक वातानुकुलीत बस हे आमचे वाहन होती. आमच्या सोबत पाककलेत तरबेज असलेले मराठी आचारी दिलेले होते. पिठले-भाकरी पासून पुरण-पोळी पर्यंत सर्व काही मेनू वर होते. आठ दिवस सर्वांची खान्याची चंगळ होती