भुरळ घालणारी श्रीलंका

श्री. मनिष केळकर यांची श्रीलंका सहलीविषयी सुरेख कविता आम्ही निघालो श्रीलंकेला , मुहुर्त ठरला 18 सप्टेंबरचा तिकिटे झाली , याद्या झाल्या , व्हिसा इत्यादि सर्व जाहले...!!! सप्टेंबरचा महिना आला....थोडे लवकर सर्व जण जमले विमानतळाला लगेच जमले, सारे सोपस्कार पुर्ण जाहले...! लंका ऐरवेजच्या सुंदर बाला सुंदर नाश्ता , सुंदर प्रवास चटकन गेला कोलंबो , रावणदेशी पाचुच्या बेटा निशांत , रणजित भेटता पुढचा प्रवास सुरु झाला...! सुंदर गोजिरे गज दर्शनाने दणदणीत भरपेट नाश्ता प्रवास आमचा सुखकर झाला छाया हॉटेल मुक्कामी...प्रथम दिवस तो संपन्न जाहला.... 1 सिगिरिया , गोल्डन बुध्दा मसाल्याच्या बागेतील सुंदर भोजन श्रीलंकेतील नाद नृत्य...दुसरा दिन संपन्न जाहला.... 2 कँडीचा तो गौतम बुध्दा, रॉयल ऑर्किड , चहाच्या बागा बिनदुधाचा चहा चांगला नुवारा एलिया तिसरा दिन हा संपन्न जाहला.... 3 अशोकवनातील सीतेचे स्थान...प्रभुरामाला नतमस्तक होऊन बेंटोटा मुक्कामी प्रवास झाला जाता जाता तरुण तरुणी....राफ्टिंग/स्विमिंग करुनी...चौथा दिन हा संपन्न जाहला......